महागाईवरून लोकसभेत खडाजंगी

February 25, 2010 9:44 AM0 commentsViews: 1

25 फेब्रुवारीमहागाईच्या मुद्द्यावरून आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. या मुद्द्यावरून आता थेट संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खडाजंगी सुरू झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिल्या दिवसाचे कामकाजही महागाईच्या प्रश्नावरून स्थगित करण्यात आले होते. आज तिसर्‍या दिवशी कामकाज सुरू झाले, तेच विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याने. सरकारची चुकीची धोरणेच महागाईला कारणीभूत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केला. साखर आयातीत भ्रष्टाचार झाल्याचे सांगत त्यांनी पवारांचा साखर सम्राट म्हणून उल्लेख केला. महागाईच्या मुद्द्यावर सरकारमध्येच मतभेद आहेत, असेही त्या म्हणाल्या.

close