14 वर्षांच्या चैतन्य आष्टणकरची सुखरुप सुटका

January 9, 2016 4:09 PM0 commentsViews:

Chaitanya12

09 जानेवारी : नागपूरच्या मनीषनगर परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या 4 वर्षिय चैतन्य आष्टनकर हा मुलगा तब्बल 36 तासांनंतर सुखरुप सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 50 लाखांच्या खंडणीसाठी चैतन्यची अपहरण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी प्रदीप निनावेसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

शाळेतून घरी परतत असताना अपहरणकर्त्यांनी चैतन्यला मारुती कारमध्ये कोंबून त्याचं अपहरण केलं होतं.चैतन्यचं अपहरण इशाक नावाच्या व्यक्तीनं त्याच्या सहकार्‍यांच्या मदतीनं केलं होतं.

इशाक आष्टनकर कुटुंबियांना ओळखत होता. तो त्यांच्या घरी कारपेंटरचं काम करायचा. अपहरणकर्त्यांनी चैतन्यच्या सुटकेसाठी 50 लाखांची खंडणी मागितली होती. मात्र नागपूर पोलिसांनी सापळा रचून अपहरणकर्त्यांचा डाव उधळून लावत चैतन्यची सुटका केली. नागपूर पोलिसांच्या एका विशेष टीमने ऑपरेशन करून नागपूर जिल्ह्यातील खापा इथल्या बडेगाव इथल्या महिलेच्या घरून चैतन्यची सुरक्षित सुटका केली. या प्रकरणामध्ये प्रदीप निनावे, एजाज इजरायल शेख, कय्युम शमशेर शेख, दुर्वास भागवत या चौघांना अटक केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close