जळगावात गुन्हेगाराच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार

January 9, 2016 5:14 PM0 commentsViews:

CM TADIPAE

09 जानेवारी : जळगावात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क एका गुन्हेगाराचा सत्कार केल्याने वाद निर्माण झाला आहे. तडीपारीचा प्रस्ताव असलेल्या नगरसेवकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ललित कोल्हे आणि अनिल चौधरींवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे या आरोग्य शिबीराच्या आयोजन समितीचे हे दोघेही सदस्य आहेत. यातील ललित कोल्हेवर तडीपारीचा प्रस्ताव होता. मात्र तो रद्द झाल्याची माहिती आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका गुन्हेगाराचा सत्कार झाल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close