प्रसिद्धीसाठी पंतप्रधानांवर टीका करणं योग्य नाही – माधव भंडारी

January 9, 2016 4:57 PM0 commentsViews:

MADHAV-BHANDARI-109 जानेवारी : स्वत:च्या प्रसिद्धीसाठी सतत पंतप्रधानांवर टीका करणं योग्य नाही. खासदार अमर साबळेंची भूमिका वैयक्तिक नाही, तर ही जनतेची भूमिका असल्याचं भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणालेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकारणाची चर्चा नकोच, असं माझं मत नाही, पण व्यासपीठाचं पावित्र्य राखूनच चर्चा व्हावी, अशी भूमिकाभंडारी यांनी मांडली आहे.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनिस यांच्या साहित्यिक क्षमतेवर सूचक मौन बाळगत, सबनिस यांचे एक पुस्तक कसेबसे मला मिळालं, असा टोला लगावला आहे. त्याचं बरोबर, साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत नावं असली तरी मंत्री हजेरी लावणार का, सांगता येणार नाही असंही भंडारी यांनी म्हटलं आहे.

शेतकर्‍यांच्या मदतीबाबत विरोधी पक्ष दिशाभूल करत असून राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या मदतीमध्ये दीडपट वाढ केली असल्याचा दावा भंडारी यांनी यावेळी केला. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सरकारने 10,500 कोटी रुपयांचा आराखडाही तयार केला. जुन्या चुका झाकण्यासाठीच विरोधकांकडून आरोप होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यंदा 1972 पेक्षा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गेल्या 100 वर्षांत पाण्याची अशी स्थिती निर्माण झाली नव्हती, असंही ते म्हणालेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close