लाच घेताना पोस्टमास्टर जनरलना अटक

February 25, 2010 9:59 AM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारीमहाराष्ट्र आणि गोव्याचे पोस्टमास्टर जनरल एम. एस. बाली यांना दोन कोटींची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मुंबईत बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडून लाच घेताना सीबीआयने त्यांना पकडले. पोस्टाच्या मालकीचा भूखंड हस्तांतर करण्यासाठी बाली 2 कोटींची लाच घेत होते. बाली यांच्या घराचीही सीबीआयने झडती घेतली. त्यामध्ये त्यांना बेहिशोबी परकीय चलन सापडले.आत्तापर्यंत एम. एम. बाली यांनी अजून कोणत्या प्रकरणात लाच घेतली आहे का याची चौकशी सीबीआय करत आहे, अशी माहिती सीबीआय जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग यांनी दिली.

close