हँकॉक पूल पाडण्याचं काम युद्धपातळीवर सुरू, एक्स्प्रेस गाड्या रद्द

January 10, 2016 2:09 PM0 commentsViews:

hancock_bridge_new10 जानेवारी : मुंबईत मध्य रेल्वेवर 137 वर्ष जुना हँकॉक पूल पाडण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी रेल्वेनं 18 तासांचा जम्बो ब्लॉकही
घेतलाय. त्यामुळे सीएसटी ते भायखळा लोकल सेवा बंद ठेवण्यात आलीये. भायखळ्याच्या पुढे लोकल जाणार नाहीत, मुंबईकडे येणार्‍या लोकल भायखळ्याहूनच परत जातील. त्यामुळे सँडहर्स्ट रोड, मस्जिद आणि सीएसटी स्टेशनमध्ये जाता येणार नाही. हा ब्लॉक संध्याकाळी 6:20 ला संपेल. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. 15 ते 20 मिनिटं उशिराने गाड्या धावत आहे. तसंच या ब्लॉकमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणाम झालाय. सीएसटीहुन सुटणार्‍या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या दादरहुन सोडण्यात येत आहे.

मेगाब्लॉकमुळे या गाड्या आज रद्द
सीएसटी मुंबई – भुसावळ पॅसेंजर
सीएसटी मुंबई – पुणे इंद्रायणी सुपरफास्ट
सीएसटी मुंबई – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – नागपूर नंदिग्राम एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – मनमाड पंचवटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – मनमाड राज्य राणी एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – अमरावती एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – लातूर एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – सोलापूर एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – पंढरपूर एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई – साईनगर शिर्डी एक्स्प्रेस
पुणे – सीएसटी मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस
मनमाड – सीएसटी मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
पुणे- सीएसटी मुंबई प्रगती एक्स्प्रेस
भुसावळ – सीएसटी मुंबई पॅसेंजर
पुणे- सीएसटी मुंबई प्रगती एक्स्प्रेस
भुसावळ – सीएसटी मुंबई पॅसेंजर
पुणे- सीेसटी मुंबई डेक्कन एक्सप्रेस
श्री शाहू छत्रपती शाहू महाराज टर्मिनस -सीएसटी मुंबई कोयना एक्स्प्रेस
पुणे- सीएसटी मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस
पुणे – सीएसटी मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close