तापी मेगा प्रकल्पाला केंद्राची मंजुरी, राज्यातील 4 लाख हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली

January 10, 2016 2:29 PM0 commentsViews:

tapi_project10 जानेवारी : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही सरकारच्या तापी मेगा रिचार्ज स्किम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. जळगावाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या मंजुरीमुळे महाराष्ट्रातली 4 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. तापीचं गुजरातला वाहून जाणार पाणी आता महाराष्ट्रातचं सिंचित करण्याची ही योजना आहे.

तापी महाकाय पुनर्भरण योजने संदर्भात शनिवारी जळगाव येथे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीआधी केंद्रीय मंत्री उमा भारती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागाचा हवाई दौरा केला होता. तापी नदीचे अतिरिक्त पाणि अडवून ते जमिनीत जिरवून मोठ्या क्षेत्राची भुजल पातळी वाढविणारी तापई मेगा रिचार्ज योजना ही देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक योजना आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसंच योजनेचे दोन टप्पे एकत्र करुन प्रकल्पाची किंमत 9 हजार कोटींवरुन 4 हजार कोटींपर्यंत खाली आली आहे. ही योजना कार्यान्वित करुन तापी काठच्या परिसराचा कायाकल्प होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी सिंचनाच्या क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी एकत्र काम करू, असं आवाहन करुन सिंचन क्षेत्रात क्रांती आणण्याचे सुतोवाच केले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close