हायड्रोजन बॉम्ब चाचणीनंतर अमेरिकेनं तैनात केलं अण्वस्त्रवाहू लढाऊ विमान

January 10, 2016 5:09 PM0 commentsViews:

usa_vs_koriya10 जानेवारी : उत्तर कोरियानं केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीनंतर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये तणाव वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेनं बी-52 हे अण्वस्त्रवाहू लढाऊ विमान दक्षिण कोरियामध्ये तैनात केलंय.

आज (रविवारी) सकाळी या विमानानं अमेरिकेच्या हवाई तळावरून उड्डाण केलं. या विमानामध्ये अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रं बसवण्यात आली आहेत. उत्तर कोरियाची जमिनीखालची शस्त्रास्त्रं नष्ट करण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता आहे.

मागील आठवड्यात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेऊन संपूर्ण जगाला धक्का दिला. या चाचणीनंतर अमेरिकेसह चीनने निषेध व्यक्त केला होता. उत्तर कोरिया सारख्या राष्ट्राने हायड्रोजन चाचणी घेतल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळेच अमेरिकेनं अण्वस्त्रवाहू लढाऊ विमान दक्षिण कोरियामध्ये तैनात केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close