‘महाराष्ट्र केसरी’ची थेट पोलीस सेवेत भरती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

January 10, 2016 7:57 PM0 commentsViews:

fadanvis_cm_sot3310 जानेवारी : महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्राची शान आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरीची थेट पोलीस सेवेत भरती केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच यापुढे क्रीडा पुरस्कारांना विलंब होणार नाही. राज्य सरकारचे क्रीडा पुरस्कार आता वेळेवर दिले जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. ते नागपूरमध्ये बोलत होते.

नागपूरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती 2016 स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली. सलग दुसर्‍यांदा जळगावच्या विजय चौधरीने विजय मिळवला आहे. चित्तथरारक लढतीत विजय चौधरीने मुंबईच्या विक्रांत जाधवला 6-3 ने चितपट करत चांदीची गदा पटकावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विजय चौधरीला चांदीची गदा प्रदान करण्यात आलीये. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र केसरीसाठी पोलीस भरतीचे दार मोकळे करून दिले. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्राची शान आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्र केसरीला थेट पोलीस सेवेत केली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close