राज ठाकरेंना 60 हजारांचा जामीन

February 25, 2010 10:49 AM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारीराज ठाकरे यांना प्रत्येक केसमध्ये 15 हजार रुपये अशा 4 केसेसमध्ये 60 हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज त्यांच्या जामीनावर गंगापूर कोर्टात सुनावणी होती. परप्रांतीयांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे राज ठाकरे यांना अटक झाली होती. तसेच 21 ऑक्टोबर 2008 ला रांजणगाव शेनपुजी इथे मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. या वेळी बस ड्रायव्हरच्या फिर्यादीवरुन राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय खादगाव इथेही गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती.

close