मोबाईलवर गाणी ऐकू दिली नाही म्हणून मुलीची आत्महत्या

January 10, 2016 7:24 PM0 commentsViews:

pimpri_3410 जानेवारी : मोबाईलवर गाणी ऐकण्यास आईने मनाई केल्याने रागाच्या भरात मुलीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड़ परिसरात घड़लीये. मृगनयनी पाचपिंडे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

मृगनयनी शनिवारी सकाळी घरात मोबाईलवर गाणी लावून ऐकत बसली होती. तिच्या आईने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि तिला गाणे ऐकण्यास मनाई करत घराकामात थोडा हातभार लावण्यास सांगितलं. याचा मृगनयनीला खूप राग आला. तीने थेट कालेवाडी परिसरातून वाहणारर्‍या पवना नदीत उड़ी मारून आत्महत्या केली. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने तिचा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह वायसीएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close