पुण्यात कचरा डेपोला पुन्हा आग

February 25, 2010 11:04 AM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारीपुण्याजवळील फुरसुंगी आणि उरुळी देवाची कचरा डेपोला काल पुन्हा मोठी आग लागली. त्यामुळे या दोन्ही गावांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. आग लागल्यानंतर महापालिकेने तातडीने आग विझविणारे पाच बंब घटनास्थळी रवाना केले. पण ही आग अजूनही धुमसत आहे. वर्षभरापूर्वी लागलेल्या आगीमुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यातून गावकर्‍यांनी शहरातून येणार्‍या कचरा गाड्या बंद आंदोलन केले होते. सध्या शहरात दररोज निर्माण होणारा 1200 टन कचरा या डेपोवर टाकण्यात येतो.

close