हँकाॅक पुलाचं पाडकाम वेळेत पूर्ण, आता आणखी पुलांची होणार दुरुस्ती

January 11, 2016 9:01 AM0 commentsViews:

hankcock_$342311 जानेवारी : मुंबईतला 137 वर्षं जुना हँकॉक पूल यशस्वीरित्या पाडत आला आणि संध्याकाळी साडे सहाच्या सुमाराला लोकलची वाहतूक सुरळीत सुरू झाली. तब्बल 18 तास यासाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

आज सोमवार असल्यामुळे काम वेळेवर पूर्ण होणं गरजेचं होतं. कारण सोमवारच्या सकाळच्या गर्दीदरम्यान जर लोकलवर परिणाम झाला असता, तर लाखो चाकरमानी खोळंबले असते. आता हा पूल नव्यानं बांधण्यात येईल. नव्या पुलाची उंची आणि रुंदी आधीपेक्षा जास्त असेल.

आधीच्या पुलाची उंची कमी असल्यामुळे लोकलचा वेग कमी करायला लागायचा. पण दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्यात येणारा हा एकच पूल नव्हे.. मुंबईतले रेल्वे लाईनवरचे अनेक पूल भविष्यात पाडण्यात येतील किंवा त्यांची डागडुजी होईल. हे होताना काही ठिकाणी वाहतूक कोंडी होईल, पण दीर्घकालीन फायद्यासाठी मुंबईकरांना हे सोसावं लागेल.

या पुलांची दुरुस्ती होणार

- एल्फिन्स्टन रोड पूल
- करी रोड स्थानकावरचा पूल
- सायन स्थानकावरचा पूल
- नाहूर
- टिळक पूल, दादर
- सायन रुग्णालयाजवळचा पूल
- कांजुरमार्ग

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close