गुलाम अलींचा मुंबई दौरा, शिवसेना विरोध करणार ?

January 11, 2016 9:09 AM0 commentsViews:

Gulam ali and shivsena11 जानेवारी : येत्या 29 जानेवारी रोजी गझल शहेनशहा गुलाम अली मुंबईत असण्याची शक्यता आहे. ‘घरवापसी’ या चित्रपटाचं म्युझिक लाँच होणार आहे, आणि यासाठी गुलाम अली उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे.

माजी टीव्ही अँकर सुहेब इल्यासी यांनी हा चित्रपट काढलाय. गेल्या वर्षी गुलाम अलींच्या मुंबई दौर्‍यावरून मोठा वाद झाला होता. गुलाम अली यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होताय या कार्यक्रमाला शिवसेनेनं विरोध केला होता.

आता यावेळी अली जर मुंबईत आले तर काय होतं, ते पाहण्याचं ठरणार आहे. मध्यंतरी पाकिस्तानी गायक अदनाम सामीने भारतीय नागरिकत्व मिळवलं आणि तो कायमचा मुंबईकर झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close