आप सरकारच्या ‘सम-विषम’ प्रयोगाचा आज हायकोर्टात फैसला

January 11, 2016 9:18 AM0 commentsViews:

delhi_aap_odd_even11 जानेवारी : दिल्लीमध्ये सम-विषम प्रयोगाबद्दल आज (सोमवारी) दिल्ली हायकोर्टात फैसला होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारच्या या योजनेला आव्हान देणार्‍या अनेक याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी त्यावरच्या सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

या निर्णयाचा दिल्लीमध्ये प्रदूषणाच्या पातळीवर काय परिणाम झालाय. त्याचं विश्लेषण करण्यासाठी ही योजना आणखी एक आठवडा सुरू राहणार असल्याचं आप सरकारनं हायकोर्टात सांगितलंय. त्यापूर्वी ही योजना फक्त एक आठवडा सुरु ठेवण्याचं हायकोर्टाने सुचवलं होतं.
शनिवारी आणि रविवारी दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी लक्षणीयरित्या घटल्याचं दिसून आलं, त्यामुळे आप सरकारला आता युक्तिवाद करायला बळ मिळणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close