नाशिकच्या बालसुधारगृहातून 12 मुलं पळाली

January 11, 2016 12:25 PM0 commentsViews:

nashik_bal_sudhargraha11 जानेवारी : नाशिकच्या किशोरसुधारगृहातून 12 मुलं पळाली. आज पहाटे ही घटना घडली आहे. मायको सर्कल सुधारगृहातून या 12 मुलांनी पळ काढलाय. यातल्या चार मुलांनी याधीही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

पलायन केलेल्या मुलांपैकी 9 मुलं पुण्याची, 2 सातार्‍याची, तर 1 जण मुंबईचा आहे. या मुलांना दरोडा आणि खुनाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. 16 फूट भिंत ओलांडून या मुलांनी पळ काढलाय. या मुलांनी भिंत ओलांडायला चादरींचा वापर केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close