दिल्लीत ‘सम-विषम’ प्रयोग सुरूच राहणार, बंदी घालण्यास कोर्टाचा नकार

January 11, 2016 12:39 PM0 commentsViews:

delhi odd even car11 जानेवारी : दिल्ली आप सरकारने सुरू केलेला सम-विषम गाड्यांचा प्रयोग आता असाच पुढे सुरू राहणार आहे. सम -विषम गाड्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला दिल्ली हायकोर्टाने नकार दिलाय. त्यामुळे हा उपक्रम 15 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. या बाबतची पुढची सुनावणी 15 जानेवारीला होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सम-विषम गाड्यांचा प्रयोग सुरू केली. 1 जानेवारीपासून या प्रयोगाला सुरुवात झाली. पण आपच्या या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आले. या याचिकांवर हायकोर्टात सुनावणी झाली. हायकोर्टाने या आप सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या निर्णयाचा दिल्लीमध्ये प्रदूषणाच्या पातळीवर काय परिणाम झालाय त्याचं विश्लेषण करण्यासाठी ही योजना आणखी एक आठवडा सुरू ठेवणार असल्याचं आप सरकारनं हायकोर्टात सांगितलं होतं. शनिवारी आणि रविवारी दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी लक्षणीयरित्या घटल्याचं दिसून आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close