नारी शक्तीचा विजय, शनी मंदिराच्या अध्यक्षपदी महिलेची निवड

January 11, 2016 12:53 PM0 commentsViews:

shani_singnapur311 जानेवारी : शनि शिंगणापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच देवस्थानच्या अध्यक्षपदी एका महिलेची निवड करण्यात आली आहे. अनिता शेटे यांची शनि शिंगणापूरच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी नानासाहेब बनकर यांची निवड झालीये. यावेळेस पहिल्यांदाच विश्वस्त मंडळात महिलांची निवड झाली होती.

अनिता शेटे आणि शालिनी लांडे या दोघींची विश्वस्त म्हणून निवड झाली होती. त्यातून अकरा विश्वस्तांच्या उपस्थितीत अनिता शेटे अध्यक्षपदी निवडून आल्या आहे. पण विश्वस्त मंडळात निवड झाली तरी शनी मंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळणार का हा प्रश्न अजूनतरी अनुत्तरितच आहे. काही दिवसांपूर्वी एक महिला चौथर्‍यावर चढली होती. चौथर्‍यावर चढून या महिलेनं शनीदेवाचं दर्शन घेतलं होतं. महिलेनं दर्शन घेतलं म्हणून हा चौथरा दुधानं धुण्यात आला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close