सीसीटीव्ही फुटेजच्या वापरावर बंदी

February 25, 2010 11:13 AM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारीपुणे स्फोटाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या वापरावर कोर्टाने बंदी घातली आहे. एका टीव्ही चॅनेलवर जर्मन बेकरी, ओशो आश्रम आणि ओ हॉटेलमधले सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यात आले होते. पुणे स्फोटाचा तपास एटीएसकडे असून फुटेज दाखविल्यामुळे तपासात बाधा निर्माण होऊ शकते, अशा आशयाची याचिका एटीएसने पुणे कोर्टात दाखल केली होती. त्यावर कोर्टाने अशा प्रकारचं फुटेज वापरण्यास बंदी घातली, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपालसिंग यांनी दिली.

close