सबनीसांनी मॉर्निंग वॉकला जाऊन दाखवलं, सनातनला प्रत्युउत्तर

January 11, 2016 1:13 PM1 commentViews:

sabanis_morning_walk11 जानेवारी : सबनीस मॉर्निंग वॉकला जात चला, अशी उघड धमकी देणार्‍या सनातन संस्थाला साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सडेतोड उत्तर दिलं. सबनीस यांनी पुण्यात मॉर्निंग वॉकला गेले.

सबनीस यांना पाठिंबा देण्यासाठी आज (सोमवारी) पुण्यामध्ये सोशालिस्ट पार्टीनं मॉर्निंग वॉक केला. पुणे रेल्वे स्टेशनाजवळ गांधी पुतळा ते कलेक्टर कचेरी परिसरातला आंबेडकर पुतळा या मार्गावर या मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीपाल सबनीस हेही यामध्ये सहभागी झाले होते. सनातन संस्थेचे संजीव पुनाळेकर यांनी ट्विट करून ‘सबनीस मॉर्निंग वॉकला जात जा’ असा वादग्रस्त सल्ला दिला होता. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता. त्याला उत्तर देत सबनीस मॉर्निंग वॉकला गेले. मी माझ्या विधानावर ठाम असून कुणाच्याही धमकीला घाबरत नाही असंही यावेळी सबनीस म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • ravikhandve

    lokmat congress che mukhpatr aahe… no surprise as they always against BJP,RSS,HINDUs. ,,Mhane snatan la pratiuttar

close