तिसर्‍या वन डेसाठी सचिन, सेहवागला विश्रांती

February 25, 2010 11:20 AM0 commentsViews: 6

25 फेब्रुवारीग्वालेर वन डेमध्ये डबल सेंच्युरी ठोकणारा सचिन तेंडुलकर आणि त्याचा ओपनिंग पार्टनर विरेंद्र सेहवागला तिसर्‍या आणि शेवटच्या वन डेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. 27 तारखेला अहमदाबादमध्ये होणार्‍या तिसर्‍या वन डेमध्ये टीम व्यवस्थापनाने नवोदित खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सुदीप त्यागी, अभिषेक नायर, रवीचंद्रन अश्विन आणि अमित मिश्रा यांना पहिल्या दोन वन डेमध्ये खेळायला मिळाले नव्हते. त्यांना आता संधी मिळण्याची शक्यता आहे.

close