नांदेडमध्ये गारपिटीमुळे पिके उद्‌ध्वस्त

February 25, 2010 11:28 AM0 commentsViews: 23

25 फेब्रुवारीनांदेड जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीने रब्बीची पिके उद्‌ध्वस्त केली आहेत. एकट्या बिलोली देगलुर तालुक्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील लाखो शेतकरी संकटात सापडला आहे. या तालुक्यात ज्वारी, गहू, हरभरा आणि केळी ही प्रमुख पिकेआहेत. पण दोन दिवस आलेल्या अस्मानी संकटाने या पिकांवर आता नांगर फिरवायची वेळ आली आहे. सर्वाधिक नुकसान केळी, ज्वारी आणि हरभरा या तीन पिकांचे झाले आहे. कांदा आणि मिरचीचेही नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाया गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.कृषी विभागाच्या माहीतीनुसार बिलोली-देलगुरु या दोन्ही तालुक्यांत मिळून दहा कोटींचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे ती नुकसान भरपाईची, राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे आहेत, त्यामुळे तातडीने मदत मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना वाटत आहे.

close