सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावा, मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

January 11, 2016 6:16 PM0 commentsViews:

Mumbai high court

11 जानेवारी : दादर पश्चिमेकडील एका शाळेत झालेल्या बलात्काराच्या घटनेची गंभीर दखल घेत शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्याचा विचार करा, अशी सूचना आज मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली.

महिलांच्या सुरक्षिततेविषयी दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने ही सूचना केली. याचिकेची सुनावणी सुरू असताना याचिकाकर्त्याच्या वकिलांनी दादरच्या शाळेतील बलात्काराच्या घटनेकडे कोर्टाचे लक्ष वेधलं. त्यावर कोर्टाने चिंता व्यक्त करत अशा घटनांना आळा घालण्यासाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणं बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना केली.

दरम्यान, शुक्रवारी रात्री दादर पश्चिमेकडील शाळेच्या टॉयलेटमध्ये चौथीतील मुलीवर शाळेच्या कँटीनमधील एका कामगाराने बलात्कार केला होता. दादरसारख्या गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close