हुसेन यांना कतारचे नागरिकत्व

February 25, 2010 11:34 AM0 commentsViews: 10

25 फेब्रुवारीप्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांना कतारने नागरिकत्व देऊ केले आहे. हुसेन यांनी त्यासाठी रितसर अर्ज केला नव्हता. तरीही कतारने स्वतःहून त्यांना आपल्या देशांचे नागरिकत्व दिले. संयुक्त अरब अमिरातच्या राज घराण्याच्या शिफारशीवरून हुसेन यांना हे नागरिकत्व मिळाल्याचे समजते. देवीदेवतांविषयी आक्षेपार्ह चित्रं काढल्याच्या आरोपावरून हुसेन यांच्याविरोधात भारतात तीव्र निदर्शने होत होती. त्यामुळे 2006 मध्ये त्यांना भारत सोडावा लागला होता. तेव्हापासून 95 वर्षांचे हुसेन दुबईत राहत आहेत. दरम्यान एम एफ. हुसेन हे भारतीय आहेत. जर त्यांना भारतात परत येण्याची इच्छा असेल तर त्यांना संरक्षण देणे हे आमचे कर्तव्य आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

close