चर्चा दहशतवादावर

February 25, 2010 11:49 AM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारीभारत आणि पाकिस्तानदरम्यान परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा दिल्लीत झाली. त्यात जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईदला अटक करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली. इंडियन मुजाहिद्दीनच्या पाकिस्तानात असणार्‍या सूत्रधारांवर कारवाई करण्याची मागणीही भारताने केली. भारताने पाकिस्तानला 26/11 हल्ल्याचा नवा डोझियर दिला. हेडली आणि राणा यांच्या मुंबई हल्ल्यातील सहभागाबाबत चौकशी करण्याचीही मागणी केली. 26/11 चा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, श्रीनगरमधल्या लाल चौकात झालेल्या एन्काऊंटरवेळी अतिरेक्यांनी पाकमधल्या सूत्रधारांशी बातचीत केली होती. त्यांचे व्हाईस सॅम्पल्स गुप्तचर संस्थाकडे आहेत. त्यावर पाकिस्तानने कारवाई करावी. अशी मागणीही भारताने पाकिस्तानकडे केली. भारताने एकूण 3 डोझियर पाकिस्तानकडे सोपवले आहेत.

close