चूल आणि मूल हा महिलांना मिळालेला वरदानच – पंकजा मुंडे

January 11, 2016 9:16 PM0 commentsViews:

Pankaja Munde14

11 जानेवारी : शनिशिंगणापूर प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा अमरावतीत एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. चुल आणि मुल हा महिलेला मिळालेला शाप नसुन ते वरदान असल्याचं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

सगळ्या महिला बचतगटाच्या सदस्यांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं, ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण व्हावं या उद्देशानं अमरावती मध्ये विभागीय महिला मेळावा तसंच स्वयंसहाय्यता बचत गटांद्वारे उत्पादित वस्तुंचे विकास गंगोत्री या विभागीय विक्री प्रदर्शनीचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्याहस्ते झालं.

मात्र यावेळी, चूल आणि मुल या मधून जर भारतातील स्त्री बाजूला झाली तर या देशाची संस्कृती सुद्धा लोपून जाईल, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केल्यामुळे पुन्हा एका चर्चेला उधाण आलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close