नवी मुंबई महापालिकेची निवडणूक 11 एप्रिलला

February 25, 2010 12:12 PM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारीनवी मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक 11 एप्रिलला होणार आहे. आजपासून आचारसंहिताही लागू झाली आहे. 11 एप्रिल रोजी मतदान तर 12 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. 15 ते 22 मार्चदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. 23 मार्चला अर्जांची छाननी होऊन अधिकृत उमेदवार जाहीर केले जातील. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 29 मार्च आहे.

close