एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची ‘घरवापसी’

January 12, 2016 8:45 AM0 commentsViews:

daya_nayak12 जानेवारी : एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात रुजू होणार आहे. नागपूरला बदली केल्यानंतर दया नायक रूजू न झाल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांची बदली रद्द करण्यात आली. आता त्यांना मुंबईत बदली देण्यात येणार आहे. त्यांना मुंबईत कुठे बदली द्यायची याचा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद घेणार आहेत.

दया नायक आधीपासून मुंबई पोलिसांत होते. दया नायक यांची कारकीर्द वादग्रस्त अशीच राहिली आहे. उत्पन्नपेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. तब्बल सहा वर्ष दया नायक सेवेतून निलंबित झाले होते. 2012 मध्ये दया नायक पुन्हा सेवेत रुजू झाले. पण निलंबित होणे हे त्यांच्यासाठी नेहमीच ठरलं होतं. नागपूरला बदली करण्यात आली पण सेवेवर रुजू न झाल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आली. अखेर आता दया नायक यांची ‘होमटाऊन’ मुंबईत बदली करण्यात आलीये असून एकाप्रकारे त्यांची ‘घरवापसी’ झालीये. दया नायक यांनी 80 पेक्षा जास्त एन्काउंटर केले आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांच्यावर बॉलीवूडमध्ये सिनेमेही बनले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close