मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी आयटम साँगवर ठुमके

January 12, 2016 9:06 AM0 commentsViews:

cm_nanded_show12 जानेवारी : नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी माळेगावात एक नवा फंडा वापरला गेला. आयोजकांनी आपलं सुपीक डोकं वापरत चक्क तरूणींना मराठी आणि हिंदी आयटम साँगवर तोकड्या कपड्यात नाचवलं.

नांदेड जिल्ह्यात दक्षिण भारतातील सगळ्या मोठी माळेगावची यात्रा भरते. माळेगाव यात्रेत खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतरच्या धनगर मेळाव्याला संबोधत करण्यासाठी मुख्यमंत्री येणार होते. पण ते येण्याआधी गर्दी जमवण्याकरता कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठी आणि हिंदी आयटम साँगवर तोकड्या कपड्यात काही तरुणींनी नाचवण्यात आलं. त्यांनी अश्लील डान्स करुन गर्दी जमवली. खरं तर मुख्यमंत्री येईपर्यंत गर्दी खेचून ठेवण्यासाठी एका कलापथकाला बोलावण्यात आलं होतं. पण, या कलापथकाने चक्क मराठी, हिंदी आणि एका तेलगु आयटम साँगवर नृत्य केलं. अतिशय तोकड्या कपड्यात व्दैअर्थी हावभाव करून नाच सुरू होता. दुपारी एकपर्यंत हा बिभत्स प्रकार सुरू होता. जमलेला समुदाय सुद्धा गाण्यांवर धुमाकूळ घालत होता. आयोजकांनी असं होऊनही हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close