सुनेचा भयावह चेहरा, सासूला केली बेदम मारहाण

January 12, 2016 12:36 PM0 commentsViews:

12 जानेवारी : सासू आणि सुनेमध्ये वाद हा प्रत्येक घरातला विषय…पण एका घरात हा वाद इतका विकोपला गेला की, सुनेनं आपल्या म्हातार्‍या सासूला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशमध्येही धक्कादायक धक्कादायक घटना घडली. मारहाण करणार्‍या सुनेला पोलिसांना ताब्यात घेतलंय. या मारहाणाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

up_cctvघडलेली घटना अशी की, उत्तर प्रदेशातल्या बिजनौर इथं राहणार्‍या जैन कुटुंबातील सुनेचा भयावह चेहरासमोर आला. संगीता जैन असं या सूनेचं नाव आहे. 70 वर्षीय सासू राजरानी या पलंगावर बसलेल्या होत्या. त्यावेळी संतापलेल्या सूनेनं सासूवर एकच हल्ला चढवला. तिने ओढणीने सासूचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. गळा दाबण्याचा प्रयत्न असफल झाल्यामुळे संतापलेल्या सुनेनं सासूला मारहाण सुरू केली. अक्षरश: बॉक्सर अंगात संचारल्यागत सुनेनं सासूला बुक्यांचा मार दिला. तिला खाली पाडण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. तिने सासूला दगडाने ठेचण्याचा प्रयत्नही केला. हा सगळा प्रकार घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे उजेडात आला. संगीता जैननं यापूर्वी स्वत:च्या नवर्‍यावर हुंडा मागितल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली होती. पोलिसांनी तिच्या नवर्‍यावर हुंडा घेतल्याचा गुन्हाही दाखल केलाय. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या सुनेला ताब्यात घेण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close