शिवसेनेत आता केवळ मांजरे…

February 25, 2010 12:26 PM0 commentsViews: 8

25 फेब्रुवारीशिवसेनेत आता वाघ राहिले नाहीत, तर सगळी मांजरे उरल्याची टीका महसूलमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्ता पाटण येथे आयोजित कार्यक्रमात राणे बोलत होते. पाटण मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आमदार शंभूराज देसाई यांनी काँग्रेसमध्ये यावे, असा सल्ला यावेळी नारायण राणेंनी दिला. यापूर्वी विलासराव देशमुख यांनी शंभूराज देसाई यांना काँग्रेसमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे शंभूराजे कोणता निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

close