नाशिक सुधारगृहातून पळालेल्या मुलांनी टाकला दरोडा

January 12, 2016 1:43 PM0 commentsViews:

12 जानेवारी : नाशिकमधल्या सुधारगृहातून 12 मुलांनी पळ काढण्याची घटना सोमवारी उजेडात आली. सुधारगृहातून पळून गेलेल्या मुलांनी चक्क दरोडा टाकल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.

nashik_sudhargrahaचोपडा लॉनपासून या मुलांनी गोदावरी नदीचा पूल पार केल्यानंतर त्यांनी एका दुकानात हा दरोडाही टाकला. त्याचं सीसीटीव्ही फुटेजही हाती आलंय. या मुलांनी एका दुकानाचं शटरवर करून हा दरोडा टाकला. पण पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन आल्यामुळे त्यांनी तिथून पळ काढला. या दरोड्यात त्यांच्या हाती अवघे 1200 रुपये लागले. दरम्यान, पळून गेलेल्या 12 मुलांपैकी दोन मुलांना निगडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या मुलांच्या शोधासाठी चार टीम तैनात करण्यात आल्या होत्या. आज आणखी चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close