बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाची वेसण, बंदी कायम

January 12, 2016 2:13 PM0 commentsViews:

bailgada_sharyat12 जानेवारी : केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतीसाठी सोडलेली ‘वेसण’ सुप्रीम कोर्टाने आता रोखलीय. तामिळनाडूमध्ये जल्लिकट्टू या बैलांच्या स्पर्धांवर आणि राज्यातल्या बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय अजून यायचाय, पण त्यावर आता तरी स्थगिती देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यतीवर केंद्र सरकारने बंदी उठवली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडा शर्यतींवर बंदी उठवण्याची अधिसूचना काढली होती. केंद्राच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर आज कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने राज्यातील बैलगाडा स्पर्धा आणि तामिळनाडूमध्ये जल्लिकट्टू या बैलांच्या स्पर्धांवर बंदी कायम ठेवलीये. ऍनिमल वेल्फेअर बोर्ड आणि पेटा या प्राणीप्रेमी संस्थांनी या याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, त्यामुळे केंद्र सरकार ऍनिमल वेल्फेअर बोर्डावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close