स्फोटाबाबतच्या पत्राचा तपास सुरू

February 25, 2010 1:07 PM0 commentsViews: 6

25 फेब्रुवारीपुणे स्फोटाची जबाबदारी सिमी इंटरनॅशनल आणि मुजाहिद्दीन इस्लामी मुस्लीम फ्रंटने स्वीकारल्याचे पत्र पुणे पोलिसांनी मिळाले आहे. हे पत्र हिंदीमिश्रीत उर्दू भाषेत लिहिलेले आहे. त्यात जर्मन बेकरीतील स्फोट या संघटनांनी घडवून आणल्याचे म्हटले आहे. या पत्राच्या पाकीटावरचा शिक्का अस्पष्ट आहे. त्यामुळे पत्र नेमके कोठून आले ते समजत नाही. तर हे पत्र पुण्यातूनच आले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. लष्कर-ए-तोयबा अल अलामी या संघटनेने पुणे स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. पाकिस्ताननेही या दहशतवादी संघटनेचा तपास करावा, असे परराष्ट्र सचिव निरुपमा राव यांनी म्हटले आहे.

close