सलमानच्या फूटपाथ अपघात प्रकरणात 16 चुका झाल्या, पोलिसांची कबुली

January 12, 2016 3:54 PM0 commentsViews:

salman

12 जानेवारी : फूटपाथ अपघात प्रकरणी आपल्याकडून 16 चुका झाल्याचं मुंबई पोलिसांनी कबूल केलंय. कोणत्याही गुन्ह्याच्या केसमध्ये प्रत्येक प्रोसिजर पाळली जाते, मात्र फूटपाथ प्रकरणात हे काही अंशी झालं नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यात सलमानच्या केसमध्ये कमाल खान हा मुख्य साक्षीदार असूनही त्याच्या राहत्या पत्यावर पोलिसंानी त्याला समन्स पाठवले नाहीत. तर आरोपींच्या रक्ताच्या नमुन्यांची हेळसांड झाल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान पोलिसांनी ही कबुली दिली आहे.

फूटपाथ अपघात प्रकरणात प्रॉसिक्यूशन पक्ष कोणताच आरोप सिद्ध करू शकला नसल्याने सलमानला निर्दोष सोडलं जात असल्याचं हायकोर्टाने म्हटलं होतं. तसंच, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांवरून मुंबई हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं होतं. दरम्यान, या चुकातून धडा घेत मुंबईतील अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी एक नवी नियमावलीही जारी केली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close