‘ते’ महात्मा फुलेंचे वारसदारच नाहीत!

January 12, 2016 7:38 PM1 commentViews:

12 जानेवारी : महात्मा फुले यांचे वारसदार म्हणून संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पथसंचलन करून संघ ही वैश्विक संघटना आहे असा सांगणार्‍यांचा आणि संघाचा ढोंगीपणा आता उघड झाला आहे. महात्मा फुले यांचे वारस असल्याचं सांगणारे नितीन फुले आणि दत्तात्रय फुले हे प्रत्यक्षात महात्मा फुले यांचे भाऊ राजाराम फुले यांचे वारस असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आधी आंबेडकरांना कब्जात घेणारा संघ महात्मा फुलेंनाही बुद्धिभेद करून ताब्यात घेत असल्याची टीका होत आहे.

413222-354557-327702-phule-wiki

पुण्यातल्या शिवशक्ती संगमात महात्मा फुले यांचे खापर पणतू दत्तात्रय फुले आणि नितीन फुले यांनी सहभाग घेतला आणि या दोघांनी पथसंचलनही केलं होतं. संघ बहुजनवादी होतोय हे दाखवण्यासाठी संघानं जाणीवपूर्वक ही बाब सगळ्यांसमोर आणली. संघ यातून महात्मा फुलेंच्या विचारांवर गदा आणण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप सत्यशोधक कार्यकर्ते करताहेत. तर दुसरीकडे दत्तात्रय फुले यांना संघाच्या समरसतेचे विचार पटताना दिसत आहेत.

महात्मा फुलेंनी आपल्या मृत्युपत्रात त्यांच्या वंशजांबद्दलच्या सगळ्या गोष्टी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्या मृत्युपत्रानुसार आताच्या कथित वंशजांच्या पूर्वजांबद्दलचा कुठलाही संदर्भ सापडत नाही. महात्मा फुलेंचे दत्तकपुत्र यशवंत यांच्या वंशावळीतून पुढे आलेल्या नीता होले म्हणताहेत की, त्याच खर्‍या महात्मा फुलेंच्या वारसदार आहेत.

बहुजनवादाचं लेबल स्वत:ला लावून घेणार्‍या संघानं आता एक वाद निर्माण करून ठेवला आहे. त्यामुळे महात्मा फुलेंचे नक्की वारसदार कोण, हाच प्रश्न आता उपस्थित होतोय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sushim N. Kamble

    ठग महाठग संघ…!!!

    वारसदार कोण हा प्रश्न उपस्थित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण संघ हा नेहमीच असे बुद्धीभेदाचे खेळ खेळत आलेला आहे.

    राजाराम फुले हे त्यांचे मोठे बंधू होते, परंतु ते नेहमीच महात्मा फुले यांचे वैचारिक शत्रू राहिले. महात्माफुले यांचे कुठलेही परिवर्तनवादि विचार राजाराम फुले यांना पटत नसत. आणि महात्माफुले यांना कुठलेही अपत्य नव्हते. हे जगजाहीर आहे. ब्राम्हण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी त्याला आपला वैचारिक वारस होण्यास पत्र असेल तरच वारस संबोधावे असे स्पष्ट आपल्या मृत्यू पत्रात नमूद केले आहे. आणि खरे वारस असतील तर तेच जे दत्तक पुत्रापासून पुढे चालत आले. आणि जे त्यांच्या वैचारिकतेला आपला वारसा मानतात. बाकी सब भंपक (संघ तर महा ठग!!!)

close