लघुउद्योगांना हवे स्टिम्युलस पॅकेज

February 25, 2010 2:54 PM0 commentsViews: 5

सागर शिंदे, पुणे 25 फेब्रुवारीआर्थिक मंदीतून लघुउद्योजकांना सावरण्यासाठी केंद्र सरकारने स्टिम्युलस पॅकेज जाहीर केले होते. मात्र उद्याच्या आर्थिक बजेटमध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेले हे पॅकेज रद्द होण्याची दाट शक्यता आहे.नुकत्याच आर्थिक मंदीतून सावरलेल्या लघुउद्योजकांनी स्टिम्युलस पॅकेज रद्द करू नये, अशी मागणी केली आहे.उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. या शहरात हजारो लघुउद्योजक आहेत. मंदीच्या काळात येथील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर होते. मात्र सरकारने जाहीर केलेल्या स्टिम्युलस पॅकेजमुळे हे उद्योग मंदीतही चालू राहिले. उद्योजकांना वरदान ठरलेले हे स्टिम्युलस पॅकेज केंद्र सरकार या बजेटमध्ये बंद करण्याच्या मनस्थितीत आहे. त्यामुळे उद्योजक चिंतेतआहेत. हे पॅकेज रद्द करू नये अशी मागणी ते करत आहेत. दरम्यान बजेटमध्ये बँकचे व्याजदर कमी करावेत आणि वीजेच्या समस्येवर केंद्राने मदत करावी अशी मागणी लघुउद्योजक संघटनेने केली आहे.नुकत्याच आथिर्क मंदीतून सावरलेल्या या लघुउद्योजकांच्या भवितव्याबाबत सरकार बजेटमध्ये कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close