परमार प्रकरणी राष्ट्रवादीत धुसफूस, नगरसेवकांचं पवारांना पत्र

January 13, 2016 9:03 AM0 commentsViews:

1sharad pawar 15th3 जानेवारी : ठाण्यातल्या सूरज परमार प्रकरणी राष्ट्रवादीतली धुसफूस चव्हाट्यावर आलीये. ठाण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गुप्त बैठक झाली. त्यामध्ये पक्षश्रेष्ठींच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. या नाराज नगरसेवकांनी अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केलीये.

सुरज परमार हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि हनमंत जगदाळे अजूनही तुरुंगात आहेत. त्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याची नगरसेवकांची भावना आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी वाढली आहे. राष्ट्रवादी नगरसेवकांनी शरद पवारांना पत्र लिहिले आहे. वरिष्ठ नेते लक्ष देत नसल्याची तक्रार त्यांनी या पत्रातून केली आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या कार्यक्रमाला नाराज 24 नगरसेवकांनी दांडी मारलीये. नजीब मुल्ला, हनमंत जगदाळे जेलमध्येच असल्याने सत्ताधारांच्या राजकारणामुळे दोघांचा बळी गेल्याची भावना आहे. मंगळवारी ठाण्यातील राष्ट्रवादी नगरसेवकांची झालेल्या गुप्त बैठकीमध्ये पक्ष श्रेष्ठींच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सुरज परमार आत्महत्या प्रकरणी नगरसेवक नजीब मुल्ला आणि हनमंत जगदाळे यांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्यामूळे नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी कोणतीही पावलं उचलली नसल्याचे पत्रच नाराज नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना लिहिले. शरद पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठाण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याला उपस्थित होते. तरीही एकूण 34 नगरसेवकांपैकी 23 जण गैरहजर राहिले. त्यामुळे हा संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close