मुंबईत चार जणांकडून 70 लाखांचे परदेशी चलन जप्त

January 13, 2016 9:27 AM0 commentsViews:

kurla_police313 जानेवारी : मुंबईत रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 जणांकडून तब्बल 70 लाख रुपये रोख सापडले आहेत. हे पैसे साडे 39 हजार डॉलर्स आणि 500 युरोच्या स्वरुपात होते. रोहित कोटवानी ,टिकंमदास खेमचंदानी, नविन कुमार कलिनानी,प्रकाश कालरा अशी या आरोपींची नावं असून चारही आरोपी कल्याणजवळच्या उल्हासनगरचे आहेत. कुर्ला रेल्वे पोलिसांनी 61 हजार अमेरिकन डॉलर आणि 39 हजार 500 युरो असे परकीय चलन 4 संशयितांकडून जप्त केले आहे.

हे चार जणं कुर्ल्यापर्यंत लोकलनं येणार आणि नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन परदेशी जाणार अशी माहिती पोलिसांना त्यांच्या एका खबर्‍याकडून मिळाली होती. 10 तारखेला संध्याकाळी रेल्वे पोलीस घाटकोपरला सांगितलेल्या डब्यात चढले. डब्यात हे चार जणं होते. कुर्ला स्टेशन येईपर्यंत या चारही जणांना पोलिसांनी धरलं होतं, आणि त्यांना अटक झाली. हे पैसे नेमके कुठे घेऊन जात होते, ते अजून कळलेलं नाही. पण रेल्वे पोलिसांनी महसून विभाग आणि एनआयएलाही याबाबत कळवलं आहे. हे पैसे कोणत्या दहशतवादी कारवाईसाठी तर वापरण्यात येणार नव्हते ना, याचा तपास पोलीस करत आहे. उल्हासनगरहून अनेक जण अरब देशांमध्ये जाऊन सोन्याची तस्करी करतात. हे पैसेही त्यासाठीच वापरण्यात येणार होते, असाही पोलिसांना संशय आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close