मुंबईत 16 ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’

January 13, 2016 10:12 AM0 commentsViews:

no_selfie13 जानेवारी : मुंबईत बॅण्डस्टॅण्ड इथं सेल्फीच्या मोहापायी तीन तरुणींचा सम्रुदात पाय घसरुण बुडाल्याच्या घटनेनंतर आता मुंबईतील 16 ठिकाणी नो सेल्फी झोन करण्याचा विचार मुंबई पोलीस करत आहे. मुंबईतील 16 ठिकाणींची पाहणी पोलिसांकडून केली जात आहे.

मागील रविवारी मुंबईतील बॅण्डस्टॅण्ड इथं तीन तरुणींचा सेल्फी काढतांना पाय घसरला आणि त्या समुद्रात बुडाल्या. तिघींना वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या रमेश वाळुंज या तरुणाने दोघींना वाचवलं पण तिसर्‍या तरुणीला वाचवतांना तिच्यासह त्याचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली. अशा घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी घेत आता मुंबईतील अशा 16 ठिकाणी नो सेल्फी झोन सुरू करण्याची चाचपणी सुरू केलीये. पोलिसांकडून 16 जागांची पाहणी सुरू आहे. यामध्ये बॅण्डस्टॅण्डसारख्या अशा 16 ठिकाणांचं समावेश करण्यात येणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close