वानरांतला ‘माणूस’

January 13, 2016 3:23 PM0 commentsViews:

13 जानेवारी : माणूस हा बुद्धीमान आणि भावनिक प्राणी आहे, असं आपण मानतो. पण वन्य प्राण्यांमध्येही याचा प्रत्यय येतो अशीच एक घटना घडली. वर्ध्याजवळच्या वायगाव -भिवापूर रोडवर. झाडालगत असलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका वानराचा मृत्यू झाला. यानंतर वानरांच्या अख्ख्या कळपाने त्यांची जागा सोडली नाही.

20-25 वानरांचा कळप या मृत वानराच्या शेजारी बसून राहिला. एक एक करत या सगळ्या वानरांनी मृत वानरांचं दर्शन घेतलं आणि या मृतदेहाजवळ ते बसून राहिले. रस्त्याने ये-जा करणार्‍या वाहनांवरही या वानरांनी नजर ठेवली आणि या मृतदेहाला काही होणार नाही याची काळजी घेतली. या वानरांनी आपल्या सहकार्‍याचा मृतदेह उचलण्याचाही प्रयत्न केला.

कधीतरी आपणही अशीच एखादी अपघाताची घटना बघतो. कुणी जखमी झालेलं असतं तर कुणाला तातडीने हॉस्पिटलला पोहोचवणं गरजेचं असतं. पण आपण कशाला या भानगडीत पडा, या भावनेनं सगळे याकडे दुर्लक्ष करून निघून जातात. पण वानरांनी दाखवलेली ही माणुसकी पाहिली की आपण स्वत:ला माणूस म्हणवून घ्यायला खरंच पात्र आहोत का असा प्रश्न पडतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close