रॉकेलवर चालतो हा फ्रिज !

January 13, 2016 3:36 PM0 commentsViews:

13 जानेवारी : टीव्ही, फ्रिज, इस्त्री अशा सगळ्या वस्तू आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वचा भाग बनलाय. या सगळ्या वस्तूंना लागते ती वीज,वीजेवर चालणारा फ्रिज आपण नेहमी पाहतोय ,पण कधी ऐकलं आहे का तुम्ही रॉकेलवर चालणारा फ्रिज, हो अगदी खरं आहे.

धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेरच्या हतिमभाई बाहेरी पिंपळनेरवाला यांच्याकडे हा रॉकेलवर चालणारा फ्रिज आहे.जो तब्बल 110 वर्ष जुना आहे, जो रॉकेलवर चालतो. हा फ्रिज 172 लिटरचा असून त्याच्या स्टँण्ड खाली रॉकेलची टाकी आहे. ज्याच्या मदतीने हा फ्रिज काम करतो. पिंपळनेर परिसरात ख्रिश्चन धर्म प्रसारक बुलर यांनी वीज नसतांना विदेशातून हा फ्रिज आणला होता. मायदेशी परततांना तो हा फ्रिज हतिमभाईंना विकुन गेले. त्यांनी हा ब्रिटीशकालीन ऐतिहासिक ठेवा आजही जपून ठेवलाय. तो फ्रिज अजून ही नव्या सारखा वाटतो.

नक्की काय काम करतो हा फ्रिज ?
या फ्रिज खाली 5 लिटर रॉकेलची टाकी आहे, त्याच्या मागे एक बर्नल आहे जो आग निर्माण करून फ्रिजला उर्जा देतो आणि फ्रिज सुरू होतो. बटनद्वारे स्पिड कमी अधीक करून बर्फही मिळतो आणि उर्जा ही नियंत्रित करता येते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close