सी लिंकचे काम रिलायन्सला

February 25, 2010 5:23 PM0 commentsViews:

25 फेब्रुवारीवांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी ते हाजी अली दरम्यानच्या दुसर्‍या टप्प्याचे काम रिलायन्स-हुंडाई कंपनीला देण्यात आले आहे.3 हजार 200 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट या 8 पदरी रस्त्याच्या कामासाठी देण्यात आले आहे. तसेच हाजी अली ते नरिमन पॉईंट या तिसर्‍या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे.पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. याखेरीज, पेडर रोडवरच्या फ्लायओव्हरचा मार्ग मोकळा झाला आहे. या फ्लायओव्हरला केंद्रीय पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.

close