सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

January 13, 2016 8:58 PM0 commentsViews:

‰úÆüÛúÖêßÖêÃÖ1231

13 जानेवारी : वाळूमाफियांची मुजोरी किती वाढलीये याचा प्रत्यय आज सोलापूर जिल्ह्यात आला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. माढा तालुक्यातील शेटफळ कुर्डूवाडी रस्त्यावर वाळूमाफियांनी तुकाराम मुंढे यांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी वाहन चालक सचिन भुंजग मिसाळ याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतून तुकाराम मुंढे थोडक्यात बचावले. तर पोलिसांनी पाठलाग करुन दोन ट्रक पकडले आहेत.

दरम्यान, सोलापुरात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच आहे. उजनी धरणपात्रातून सातत्यानं अवैध वाळू उपसा होतोय, तो रोखण्यासाठी ही कारवाई केली जात होती. एप्रिल 2015 मध्ये 80 – 90 टिपरमधून अवैधरीत्या उपसा झालेली वाळू रोखली होती आणि वाळू उपसा करणार्‍यांवर 265 कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. तेव्हापासूनच वाळूमाफियांचा त्यांच्याविरोधात रोष आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close