‘मुळा-मुठा’ होणार प्रदूषणमुक्त, जपानच्या कंपनीसोबत 900 कोटींचा करार

January 14, 2016 8:54 AM0 commentsViews:

mula_mutha14 जानेवारी : मुळा मुठा नदीचं प्रदूषण कमी करण्यासंदर्भात जपानमधल्या जिका अर्थात जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी या कंपनीशी महत्त्वपूर्ण करार करण्यात आलाय. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली.

बुधवारी या 900 कोटींच्या करारावर स्वाक्षर्‍या झाल्या.  प्रकाश जावडेकर यांनी या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. केंद्र सरकार, पुणे महापालिका जायकाच्या मदतीने हा प्रकल्प पार पाडणार आहे. मुळा मुठातलं प्रदूषण कमी करणं आणि पाण्याची शुद्धता वाढवण्यासंदर्भात प्रकल्पात काम होणार आहे. जिका या प्रकल्पासाठी 900 कोटींचं कर्ज देणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close