भुखंडाचे श्रीखंड पुन्हा नेत्यांच्या ताटात,भूखंड दत्तक योजना मंजूर

January 14, 2016 9:09 AM0 commentsViews:

mumbai_landमुंबई – 14 जानेवारी : मुंबईतील मोकळ्या भुखंडाचे श्रीखंड पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या ताटात मांडले जाणार आहे. आधीच अनेक भूखंड राजकीय नेत्यांच्या घशात गेल्यामुळे वादात आलेली भूखंड दत्तक योजना गुरुवारी पुन्हा मुंबई महापालिकेच्या सभागृहात संमत झाली. भाजपनं आयत्या वेळी बदलेल्या भुमिकेमुळे शिवसेनेला हे धोरण संमत करण शक्य झालं. या धोरणामुळे मुंबईतल्या मोकळ्या भुखंडाचं श्रीखंड खाण्याची मुभा पुन्हा एकदा राजकीय नेत्यांना आता मिळाली आहे.

यापूर्वीही मुंबईतले सुमारे 225 मोकळे भूखंड या धोरणामुळे राजकीय नेत्यांच्या फस्त केले आहे. त्यात सेना- भाजपच्या नेत्यांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. मुख्य म्हणजे ज्यानी जुन्या धोरणाचा गैरवापर करत जमिनी फस्त केल्या त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाहीय. उलट पुन्हा एकदा या भुखंडाचं दान त्यांच्या पदरात पडणार आहे. कमकुवत विरोधी पक्ष सुद्धा हे धोरण संमत मंजूर होण्यास कारणीभूत ठरलंय. एरवी छोट्या छोट्या मुद्यांवर कामकाज बंद पाडणारे विरोधक मात्र कामकाज चालू देत होते. परिणाम बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर झाला.

भुखंडाचं श्रीखंड ‘ रिटर्नस’

निर्णयाचा फायदा यांना होणार
– उद्योगमंत्री सुभाष देसाई- प्रबोधन सभागृह
– गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर- मातोश्री क्लब
– आ. सुनील प्रभू – आर्यभास्कर क्लब
– खा. गजानन कीर्तीकर- आर्यभास्कर क्लब
– खा. गोपाळ शेट्टी- पोईसर आणि कमला विहार क्लब
– विनोद घोसाळकर – दहिसर स्पोर्ट्स क्लब
– प्रवीण दरेकर – फुलपाखरू मैदान
– शिवसेना नेते डॉ. रमेश प्रभू

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close