रेल्वेच्या टपावर चढणं जीवावर बेतलं

January 14, 2016 9:55 AM0 commentsViews:

मुंबई – 14 जानेवारी : रेल्वेच्या टपावर बसून प्रवास करू नका असं वारंवार सांगितलं जात पण हौशी प्रवाशांवर याचा काही परिणाम होत नाही. मुंबईत रेल्वेच्या इंजिनवर चढणं एका प्रवाशाच्या जीवावर बेतलं.local_burn

लोकमान्य टिळक टर्मिनसवर बुधवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास प्लॅटफार्म क्रमांक 2 वरएक प्रवाशी एक्स्प्रेस ट्रेनच्या इंजिनवर चढला. काही वेळानंतर उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला धक्का लागला आणि जागेवरच जळाला. ताबडतोब वीज प्रवाह बंद करण्यात आला. घटनास्थळावर असलेल्या रेल्वे कर्मचारी आणि लोकांनी आग प्रतिबंधक यंत्राने त्याच्यावर फवारे मारले त्यानंतर त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा व्यक्ती प्लॅटफार्मवर आला तेथे पोलीस आणि तिकीट तपासणी सुरू आहे. हे पाहुन घाबरला आणि इंजिनवर चढला. या व्यक्तिची ओळख मात्र अजून होऊ शकली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close