‘भारतरत्न’साठी सचिनची शिफारस करणार

February 26, 2010 12:18 PM0 commentsViews: 2

26 फेब्रुवारीसचिन तेंडुलकरची भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.ते नांदेडमध्ये बोलत होते. ग्वाल्हेर वन डेमध्ये 200 रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर सचिनवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला.त्याच्या या अजोड कामगिरीची दखल घेऊन त्याला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे, अशी एकमुखी मागणी क्रीडाप्रेमींकडून होत आहे. या लोक आग्रहाची दखल आता मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे. सचिनला भारतरत्न देण्यासाठी आपण शिफारस करणार आहोत, असे आता त्यांनी जाहीर करून टाकले आहे.

close