हॅरि पॉटरमधील अॅलन रिकमन यांचं निधन

January 14, 2016 6:48 PM0 commentsViews:

fhd005PAG_Alan_Rickman_005

14 जानेवारी : ‘हॅरी पॉटर’ या जगप्रसिद्ध मुव्ही सीरिजमध्ये ‘प्रोफेसर स्नेप’ची भूमिका अजरामर करणारे ब्रिटिश अभिनेते ऍलन रिकमन यांचं आज निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. रिकमन गेल्या बर्‍याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्या कुटुंबियांनी आज (गुरूवारी) त्यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला.

‘हॅरी पॉटर’शिवाय त्यांच्या ‘डाय हार्ड’, ‘ट्रूली, मॅडली, डीपली’ आणि ‘रॉबिन हूड – प्रिन्स ऑफ थिफ्ज’ या सिनेमातल्या भूमिकाही खूप गाजल्या.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close