महाराष्ट्राचे नवे सांस्कृतिक धोरण

February 26, 2010 1:50 PM0 commentsViews: 10

अशिष जाधव, मुंबई26 फेब्रुवारीमहाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी कधी नव्हे तो मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे राज्याच्या सांस्कृतिक धोरणातही त्याचे प्रतिबिंब उमटणार आहे.तज्ज्ञांकडून मसुदासुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याचे सांस्कृतिक धोरण नव्याने ठरवले जात आहे. त्यासाठी तज्ज्ञांकडून मसुदासुद्धा तयार करून घेण्यात आला आहे. नव्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्याचा आढावा घेतल्यावर मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा प्रश्न राज्य सरकारने किती गांभिर्याने घेतला, हे सहज ध्यानात येते. भाषा सल्लागार मंडळ मराठी भाषेच्या समृद्धीसाठी मराठी भाषा सल्लागार मंडळ तसेच प्रमाण भाषा कोश मंडळ स्थापन करणे, मराठीच्या बोली भाषा विकसित करण्यासाठी मराठी बोली अकादमी स्थापन करणे, हिंदी राज्यांमध्ये मराठी अकादमी स्थापन करण्यावर भर देणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठात, तर महर्षी विट्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने ऑक्सफोर्ड विद्यापीठात मराठी अध्यासन केंद्र निर्माण करणे,अशा अनेक शिफारसी मसुद्यात करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र विद्यामहाराष्ट्र विद्या अशी एक नवी ज्ञान शाखा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र प्रगत अध्ययन केंद्र स्थापन करणे, सूचना आणि माहिती फलकावरील कार्यक्रमविषयक मजकूर प्रथम ठळक अक्षरात मराठीमध्ये लिहणे बंधनकारक करणे, मंत्री तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांना सर्वाजनिक कार्यक्रमांमध्ये मराठी बोलणे आवश्यक करणे, केंद्रीय अस्थापनांमध्ये अधिकाधिक मराठी अधिकार्‍यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करणे, अशा अनेक शिफारसींद्वारे मराठी भाषा आणि मराठी बाणा सर्वत्र प्रसारित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. परंपरांचे अवडंबर थांबवाप्रचलित वाक्यप्रचार अथवा रुढ झालेल्या चुकीच्या शब्दांना काळानुरूप बाद करणे. तसेच काही कालबाह्य चालीरिती आणि परंपरांचे अवडंबर थांबवण्याची महत्त्वाची सूचना मसुदा समितीने केली आहे. या निमित्ताने खरेच प्रस्थापित सांस्कृतिकतेला छेद देण्याचे धाडस राज्य सरकार दाखवेल का ? हे आता पाहावे लागेल.ज्येष्ठ समिक्षक आ. ह. साळुंखे यांच्या समितीने सादर केलेल्या मसुद्यावर आधारीत राज्याचे हे सांकृतिक धोरण राज्य सरकार येत्या 1 मे ला म्हणजे महाराष्ट्र दिनी जाहीर करणार आहे.

close